आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी दर्शनाहून परतणार्‍या भाविकांचे दागिने लुटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - देवदर्शन आटोपून घराकडे परतणार्‍या भाविकांना चोरट्यांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवत त्यातील महिलांचे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रकार नागपूर-मुंबई मार्गावरील लासूरगाव शिवारात शुक्रवारी रात्री अकरा वाजता घडला. या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात वाटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील वंजारा तांडा (ता. लोणार) येथील विठ्ठल धर्मा राठोड हे कुटुंबीयांसह खासगी वाहनातून लोणारकडे परतत असताना शुक्रवारी रात्री अकरा वाजता लासूरगाव शिवारात त्यांच्या गाडीचे टायर पंक्चर झाले. पंक्चर झालेले टायर बदलताना रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या अंगावरील दोन लाख रुपयांचे 9 तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले. या प्रकरणानंतर विठ्ठल राठोड यांच्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरट्यांनी आता रस्त्यावरील धावती वाहने अडवून चोरी करण्याचा धडाका सुरू केल्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.