आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादातून एकास रॉकेल टाकून पेटविले; आठ जणांवर गुन्हा: परतूर तालुक्यातील पाटोदा येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतूर- जुन्या वादातून एकास रॉकेल टाकून पेटवून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना परतूर तालुक्यातील पाटोदा येथे शुक्रवारी रात्री वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी गावातील आठ जणांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

परमेश्वर सिताराम नखाते हे शुक्रवारी रात्री पाटोदा- परतूर रोडवर साकळगाव फाट्यावर आले होते. त्याचवेळी गावातील रामजी खवल, सुभाष खवल, नागनाथ खवल, शेख सुभानी शेख अहेमद, गोपू उर्फ उमेश कुलकर्णी, गणेश तांबे, विष्णू तांबे, शाहूराव मुंढे (सर्व रा. पाटोदा माव ता.परतूर) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून परमेश्वर नखाते यांना चापट-बुक्यांनी मारहाण केली. यामुळे ते जखमी झाले आहेत. या प्रकारानंतर आरोपींनी कॅनमधील रॉकेल अंगावर टाकून पेटवून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असे पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सोमवारी आठ जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास एपीआय पंकज जाधव हे करीत आहे. 
बातम्या आणखी आहेत...