आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’ पळाली, ‘तो’ सापडला; विवाहितेला तरुणाने फूस लावून पळवून नेले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- परळी तालुक्यातील अस्वलंबा येथे लग्नानंतर धोंडेजेवणासाठी माहेरी आलेल्या विवाहितेला गावातीलच तरुणाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पतीने ३१ जुलै रोजी दाखल केली. विवाहिता व तिच्यासोबतच्या तरुणाला उमराईतून ताब्यात घेतले. २ ऑगस्ट रोजी वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर करणार तोच विवाहितेने पोलिसांना लघुशंकेचे कारण समोर करून धूम ठोकली. तिच्यापाठोपाठ पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मात्र पोलिसांनी पकडून गजाआड केले.

परळी तालुक्यातील अस्वलंबा येथील युवतीचा विवाह टाेकवाडी येथील तरुणाशी झाला. त्यानंतर धाेंडेजेवणाच्या निमित्ताने १४ जून रोजी नवदांपत्य अस्वलंबा येथे आले. मात्र, १७ जून रोजी गावातील तरुण नितीन ढाकणे याने विवाहितीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार घेऊन पतीने ठाणे गाठले. त्या वेळी तक्रार काही दाखल झाली नाही. काही दिवसांनी विवाहिता व नितीन ढाकणे हा तरुण उमराई येथील पाहुण्यांकडे असल्याची माहिती विवाहितेच्या पतीला कळली. तशी माहिती घेऊन पतीने पुन्हा अंबाजोगाईतील ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. त्यावरून ३१ जुलै रोजी पोलिसांनी विवाहिता व नितीन ढाकणे याला उमराईतून ताब्यात घेतले. दोघांचीही स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. ३ ऑगस्ट रोजी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असतानाच विवाहितेने लघुशंकेचे कारण सांगितले आणि तशीच धूम ठोकली. नितीन ढाकणेही पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पकडले.

दरम्यान, सोमवार, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळपर्यंत विवाहिता काही पाेलिसांच्या हाती लागली नाही. पोलिसांच्या निगराणीत असताना कशी काय पळून जाऊ शकते? पोलिसांनी विवाहितेला तीन दिवस ठाण्यात का बसवून घेतले, असे काही प्रश्नही या घटनेत उपस्थित होत आहेत.
बातम्या आणखी आहेत...