आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार करणा-या तिघांवर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - महिलेला दुचाकीवरून पळवून नेत तिघा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा नोंदवत एकास अटक केली आहे.
तालुक्यातील ठाकरआडगाव येथील महिला रात्रीच्या वेळी बाहेर गेली होती. घरी येत असताना वाटेत गावातील गणेश कचरू जंगले, ज्ञानेश्वर महादेव गाडे व मच्छिंद्र राजाराम कोकाटे यांनी महिलेला बळजबरीने दुचाकीवर (एमएच-२३-१३४२) चाकूचा धाक दाखवत मादळमोहीहून पुण्याला नेले. वाटेतच करंजी घाटाच्या पुढे शेतात तिच्यावर अत्याचार केला. त्यांनतर महिलेला पुण्यात एका नातेवाइकाकडे ठेवण्यात आले. १६ जानेवारी रोजी पुण्यात थांबवल्यानंतर १७ जानेवारी २०१५ रोजी तीला दुचाकीवरून गेवराईला आणत असताना रात्री अकराच्या सुमारास पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तिला गेवराईच्या बसस्थानकावर सोडून देऊन आरोपी फरार झाले. महिलेने नातेवाइकांना हा प्रकार सांगितल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल झाला.