आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत अश्लील एसएमएस पाठवणाऱ्यावर गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली | औंढा नागनाथ येथे महिलेला अश्लील एसएमएस पाठविल्याबद्दल आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नागनाथ करणे असे या आरोग्य कर्मचाऱ्याचे नाव असून तो मलेरिया विभागात काम करतो. त्याने औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या महिलेला ८ डिसेंबर रोजी अश्लील एसएमएस पाठवले. एमएमएस पाहिल्यावर सदर महिलेने नागनाथ करणे याला जाब विचारला असता त्याने त्या महिलेला जिवे मारण्याची धमकी देत पुन्हा अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे पीडित महिलेने मंगळवारी औंढा नागनाथ येथील पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...