आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांच्या तावडीतून सराईत आरोपी फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, पोलिसांवर गोळीबार आदी प्रकरणांत गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार गजानन तौरने बुलडाणा कारागृह पोलिसांच्या तावडीतून धूम ठोकली. पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणात जालना न्यायालयात सुनावणी झाल्यावर परत जाताना शहराजवळील हॉटेल आशीर्वादमध्ये शुक्रवारी रात्री ८ वाजता सर्वजण जेवणासाठी थांबले होते. येथेच कारागृह पोलिसांना चकवा देऊन तौर पळून गेला.

या घटनेची माहिती मिळताच गुन्हेशाखेसह विशेष कृती दल, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस ठिकठिकाणी रवाना झाले आहेत. २७ सप्टेंबर २०१५ रोजी ऐहतेशाम मंजूर अहमद (१७) याचे अपहरण झाले होते. पोलिसांनी २६ तास पाठलाग करून तौरसह त्याच्या साथीदाराच्या तावडीतून ऐहतेशामची सुटका केली होती. रात्रीच्या वेळी तौरने गोळीबार केला असता ऐहतेशामचा भाऊ इफ्तेखोर हा जखमी झाला होता, तर पोलिस थोड्याहून बचावले होते. दरम्यान, पोलिस पाठलाग करत असल्याचे पाहून तौर व त्याचे साथीदार इंडिका कार घटनास्थळी सोडून पसार झाले होते. याप्रकरणी सपोनि बांगर यांच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. काही िदवसांनंतर त्याला पथकाने तौरसह साथीदारांना पकडले होते.
बातम्या आणखी आहेत...