आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ डाॅक्टरची प्रकृती चिंताजनक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - येथील सर्वोपचार रुग्णालयातील विष घेतलेल्या प्रशिक्षणार्थी डाॅक्टरची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ते बरे व्हावेत यासाठी डाॅक्टरांची टीम शर्थीचे प्रयत्न करत आहे.

अमोल भीमराव गावंडे (२९) हे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बधिरीकरण या विषयात एमडी करत आहेत. एमडीचे त्यांचे हे तिसरे वर्ष आहे. शनिवारी रात्री त्यांनी प्रसूती विभागात रात्री १० वाजेपर्यंत सेवा बजावली. त्यानंतर ते वसतिगृहाकडे गेले होते. रात्री पावणेअकराच्या सुमारास वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात ते बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यानंतर त्यांना डाॅक्टरांनी तपासले. नाडीचे ठोके कमी झाल्याने त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.
त्यांना विषबाधा झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी सांगितले. तथापि, त्यांनी विष घेतले की एखाद्या ड्रग्ज सेवनाने ते बेशुद्ध झाले याबाबत काहीही माहिती नसल्याचे डाॅक्टर म्हणाले. विशेष म्हणजे त्यांच्या केस पेपरवर ‘अननोन पाॅयझनिंग’ असा उल्लेख करण्यात आला आहे. डाॅ. अमोल हे शांत स्वभावाचे असून त्यांचे सर्वांशी मैत्रीचे संबध आहेत, असे आयसीयूमधील कर्मचारी व्ही. एस. लहाने यांनी सांगितले.

एक वर्षापूर्वीही केला होता प्रयत्न : डाॅ. अमोल गेल्या वर्षी वसतिगृहातील त्यांच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यांनी ड्रग्ज घेतल्याने ते बेशुद्ध पडले होते, असे निदानात निष्पन्न झाले होते. त्यामुळे आताचा प्रकारही तसाच असू शकतो, अशी चर्चा आयसीयूमधील डाॅक्टर व कर्मचारी करत होते.