आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात छेड काढणा-या युवकास जमावाने बेदम चोप दिला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - युवतीची छेड काढणार्‍या युवकाला जमावाने बेदम चोप देत त्याची दुचाकी पेटवून दिली. शहरातील मंमादेवी मंदिर परिसरात सकाळी 9 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला. याप्रकरणी पोलिसांनी त्या युवकास अटक केली आहे.
शहरातील नवा मोंढा परिसरात राहणारी 21 वर्षीय युवती मंगळवारी सकाळी मंमादेवी मंदिरात दर्शनासाठी येत होती. आरेफ अंसारी रहिमोद्दीन अंसारी (20, हिंदनगर, जालना) हा तिचा पाठलाग करीत मंदिरापर्यंत आला. ती युवती घाबरून मंदिरात आर्शयास गेली. आरेफही तिच्या मागे तेथे गेला. त्याने मंदिरात जाऊन तिची छेड काढली. हा प्रकार मंदिरातील पुजारी आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या लक्षात आला. त्यांनी आरेफची विचारपूस सुरू केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संबंधित युवती नात्यातील असल्याची थाप त्याने मारली अन् मंदिरातून पळ काढला. मंदिरापासून जवळच असलेल्या लोखंडी पुलाजवळ जमावाने आरेफला पाठलाग करून पकडले. तेथे त्याला जोरदार चोप दिला. यात तो जखमी झाला. हा प्रकार पाहून त्याच्यासोबत आलेल्या अन्य एका युवकाने धूम ठोकली. आरेफची दुचाकी (टी.व्ही.एस. अपाचे ) मंदिरासमोर उभी होती. हे लक्षात येताच जमावाने दुचाकी पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सूर्यकांत चाटे, गजानन भोसले यांच्यासह कदीम जालना पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दिवसभर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
विविध कलमांनुसार गुन्हा
आरेफ अन्सारी याच्याविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात विनयभंग, अँट्रॉसिटी आणि धार्मिक स्थळाची विटंबना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिदास जाधव करीत आहेत.
जमावाचा युवतीला धीर
या प्रकारानंतर घाबरलेली युवती घरी निघून गेली. शिवसेनेचे नगरसेवक महेश दुसाने, शहरप्रमुख अंकुश पाचफुले, रोहित बनवस्कर यांच्यासह अन्य काही युवकांनी या युवतीचा शोध घेतला. तिला धीर देत पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर या युवतीने पोलिसांत तक्रार दिली.