आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाड रेल्‍वे स्‍थानकावर प्रवाशांची झुंबड, सुट्टया आणि लग्‍नसराईमुळे गर्दीत प्रचंड वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड - लग्‍न सराईचा हंगाम  आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुंबळ गर्दी दिसून येत आहे. रेल्वे फलाटावर येताच जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची चढाओढ सुरू होते. रेल्वेच्‍या पार्सल बोगीमध्‍येदेखील प्रवासी शिरण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत.

राज्‍यभरात एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून शाळा महाविद्यालयांना सुट्टया लागल्या आहेत. त्‍यामुळे अनेक कुटुंब पर्याटनाला निघाले आहेत. तसेच अनेक पर्यटक परप्रातांतून रेल्वेने मनमाड येथे येतात आणि तेथून शिर्डी, श्रीक्षेत्र शिंगणापूर, जगप्रसिध्द आजिंठा, वेरूळ लेणी अशा पर्यटन स्‍थळांना भेट देतात. त्यातच सध्या दाट लग्नतिथी आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्‍या प्रचंड वाढली आहे. मनमाड येथे रेल्‍वेत जागा मिळेलच याची कोणतीही शाश्‍वती नसल्यामुळे मिळेल त्या बोगीत शिरण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडते आहे. भरउन्‍हाळ्यात या वाढत्‍या गर्दीमुळे रेल्वे प्रवासदेखील जिकीरीचा ठरत आहे.
 
रेल्वेचे तिकिट काढायला लांबच लांब रांगा, हाऊसफुल झालेले आरक्षण शिवाय रेल्वे गाड्यात गर्दी, असेच चित्र सध्‍या मनमाड रेल्‍वेस्‍थानकावर पाहायला मिळत आहे.
 
पुढील स्लाइडवर वाचा, पांझण नदीच्‍या पुनरुज्‍जीवनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचा पुढाकार, मनमाडकरांची पाणी टंचाई कमी होण्‍याची शक्‍यता...
 
बातम्या आणखी आहेत...