आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग सुट्यांमुळे तुळजापूर नगरी भाविकांनी गजबजली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - सलगच्या सुट्यांमुळे तुळजाईनगरी भाविकांनी गजबजली आहे. रविवार (दि.११) सकाळपासूनच दर्शन मंडप भाविकांच्या गर्दीने फुलून रांगा होमकुंडापर्यंत पोहोचल्या होत्या. व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतल्याने भाविकांना दिलासा मिळाला आहे. दत्तजयंती पौर्णिमेमुळे तुळजापुरात बुधवारपर्यंत (दि.१४) गर्दी कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. धर्मदर्शनासाठी ३ तर मुखदर्शनासाठी २ तासांचा कालावधी लागत होता. दरम्यान, अभिषेक पूजेच्या निर्धारित वेळेत दुपारी ११ वाजेपर्यंत १० हजार भाविक रांगेत होते. त्यांना अभिषेक पूजेपासून वंचित राहावे लागले. पहाटेच्या गारव्यात अभिषेक पूजेची रांग आराधवाडी परिसरात पोहोचली होती.

बुधवारपर्यंत गर्दी
यातच दत्तजयंती पौर्णिमा आल्याने भाविकांची गर्दी बुधवारपर्यंत (दि.१४) कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाविकांच्या गर्दीने बाजारपेठ गजबजली असून व्यापाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. लॉजचालकांनी अचानक दरवाढ करून चढ्या दराने रूम दिल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे व्हीआयपी दर्शन दुपारी चारपर्यंत बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला. भाविकांचे दर्शन सुलभ होण्यासाठी मंगळवार, शुक्रवार व रविवारी मंदिर पहाटे १ वाजता खुले करण्यात येत आहे. मंदिर संस्थानच्या या निर्णयामुळे भाविक, पुजारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...