आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डे चुकवण्याचा प्रयत्न, बस उलटली, हिंगोली जिल्ह्यातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात हैदराबाद येथून इंदूरला जाणारी बस बुधवारी पहाटे सव्वातीन वाजता उलटून १२ प्रवासी जखमी झाले. त्यांना हिंगोली येथील सरकारी व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व प्रवाशांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. हैदराबाद येथून इंदूर येथे जाणारी खासगी बस (यूपी ७५ एटी ००९६) कळमनुरीहून हिंगोलीकडे येत होती. सावरखेडा गावाजवळ हा अपघात घडला. रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. यात चालकासह बसमधील १२ प्रवासी जखमी झाले.

स्टिअरिंग रॉड तुटल्याने बस उलटली; २ जखमी
वडीगोद्री | स्टिअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस उलटली. बुधवारी दुपारी २ वाजता औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महाकाळा पाटीजवळ ही दुर्घटना घडली. दोन प्रवासी जखमी झाले. पाटाेदा आगाराची बस (एमएच २०-०५५९) जालन्याहून बीडकडे जात होती. औरंगाबाद-सोलापूर मार्गावर महाकाळा पाटीजवळ बसचा स्टिअरिंग रॉड तुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या कडेला ६ फूट खोल खड्ड्यात उलटली. यात बसचालक एस. एस. बांगर (४२, पाटोदा) व रामदास लक्ष्मण चव्हाण (४०, आनंदवाडी, ता. गेवराई) हे दोघे जखमी झाले.
बातम्या आणखी आहेत...