आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुळजापुरात हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट; दोन महिला कामगार जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - शहरातील वर्दळीच्या भवानी रोडवरील हॉटेल पावन (उडप्पी) येथे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन लक्ष्मीबाई छगन क्षीरसागर  (रा. तुळजापूर) या व ज्योती दशरथ बोबडे (रा. बिजनवाडी) या दोन महिला कामगार जखमी झाल्या. ही घटना गुरुवारी (दि. २३) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत हॉटेलमधील दोन महिला कामगार गंभीर जखमी झाल्या आहेत. याच वेळी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेले देवीभक्त मोठ्या संख्येने भोजनासाठी थांबले होते.  या स्फोटानंतर या भाविकांसह कामगारांनी हॉटेलबाहेर पळ काढला.   
बातम्या आणखी आहेत...