आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित कुटुंबावर जातभाईंकडूनच बहिष्कार, आत्महत्येशिवाय पर्याय नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील दलित कुटुंबावर गावातील स्वजातीयांनीच बहिष्कार टाकल्याचा प्रकार समोर आला अाहे. या प्रकरणी निलंग्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. भवानजी आगे-पाटील यांनी संबंधितांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
बाबूराव नागनाथ कांबळे (७०) यांच्या कुटुंबावर बहिष्कार घालण्यात आला आहे. कांबळे हे मजुरी करतात. त्यांच्या पत्नी चित्राबाई या घरीच असतात. त्यांना तीन मुलगे असून मोठा मुलगा सिद्धोधन हा पुणे महानगरपालिकेत नोकरीला आहे, तर दुसरा अभितोधन हा पंजाबमध्ये पीचडी करत आहे. लहान मुलगा शुक्लोधन गावातच असून तो आई-वडिलांसोबत राहून पदवीचे शिक्षण घेत आहे. बाबूराव कांबळे हे बौद्ध धम्म प्रचाराचे कार्यही करतात.
कांबळे यांच्या कुटुंबावर गावातील त्यांच्याच समाजातील मंडळींनी २०११ पासून बहिष्कार घातला आहे. समाजातील कोणाचे निधन झाल्यास कांबळे यांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारास येऊ दिले जात नाही. सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यास मनाई आहे. लग्नकार्यालाही येऊ दिले जात नाही. बाबूराव हे कोठे धार्मिक विधीस गेले तर एक तर बाबूराव कांबळेला बोलवा नाहीतर आम्हाला, असे म्हणून ते निघून जातात. डॉ. आंबेडकरांच्या सार्वजनिक जयंतीमध्येही सहभागी होऊ दिले जात नाही. त्यामुळे बहिष्कारातून मुक्त करण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे.

बाबूराव कांबळेयांचा अर्ज २९ जानेवारी रोजी प्राप्त झाला आहे. त्यानंतर दोन फेब्रुवारी रोजी निलंग्याचे पोलिस उपअधीक्षक आणि तहसीलदारांना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. -आर. एम. शिंदे, नायबतहसीलदार, एसडीओ कार्यालय, निलंगा
बहिष्कारासंदर्भात अनेकवेळा प्रशासनाला कळवण्यात आले आहे, परंतु दखल घेण्यात आली नाही. जातीच्याच लोकांनी बहिष्कार टाकल्याने अवघड झाले आहे. त्यामुळे बहिष्कार परत घेतल्यास कुटुंबासह आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. -बाबूराव कांबळे, रामलिंगमुदगड, ता.निलंगा