आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित महिलेस मारहाण, १३ आरोपींना कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - बोरगाव येथील दलित महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी पाच महिलांसह एकूण १३ आरोपींना सोमवारी न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.
आरोपींना ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत संपल्याने पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे यांनी त्यांना न्यायालयासमोर उभे करून कोठडीत वाढ करण्याची मागणी केली, परंतु न्यायाधीशांनी त्यांची मागणी फेटाळत आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संग्राम कवडे, अशोक कवडे, बालाजी कवडे, गणपती कवडे, श्रीपती कवडे, तानाजी कवडे, धनाजी कवडे, सुधाकर कवडे, हिरकणबाई कवडे, चंद्रकला कवडे, कमळाबाई कवडे, धोंडूबाई कवडे, मुक्ताबाई कवडे यांचा समावेश आहे. मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी गावचा सरपंच गोपाळ नरवटे व विनायक भोसले फरारच आहेत.

गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या
निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथे वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कासार शिरसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कमलाकर नारायण बोरले (६५) असे मृताचे नाव आहे.