आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दलित महिलेची धिंड; वीस जणांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - ५० वर्षीय दलित महिलेला मारहाण करून तिची अर्धनग्न धिंड काढल्या प्रकरणात गावच्या सरपंचासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकूर तालुक्यातल्या बोरगाव येथे बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्याबद्दल शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पोलिस अधीक्षकांकडे विचारणा केली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याची विनंती गोऱ्हे यांनी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला व गावकर्‍यांत रस्त्यावरून जुना वाद आहे. यावरून या महिलेने उपोषणही केले होते. त्याचा राग मनात धरून गावचे सरपंच गोपाळ धोंडिराम कानवटे व अन्य २० जण बुधवारी रात्री महिलेच्या घरावर चाल करून गेले.

महिला घरासमोर उभी असताना रस्त्याच्या कारणावरून सरपंच कानवटे यांनी तिला शिवीगाळ केली. त्यानंतर तिच्या अंगावरील कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत ितला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्या वेळी गावातील एकानेही पुढाकार घेऊन मध्यस्थी केली नाही. गावकर्‍यांसमोर भररस्त्यात अर्धनग्न करून मारहाण झाल्याने महिला भेदरून गेली. तशा अवस्थेतच तिने चाकूर पोलिस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे यांनी तिला फिर्याद देण्यास सांगून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

यांच्यावर गुन्हा दाखल
गोपाळ धोंडीराम कानवटे (सरपंच), विनय भोसले, श्रीपती कवडे, संग्राम कवडे, शत्रुघ्न कवडे, विठ्ठल कवडे, बालाजी कवडे, धनाजी कवडे, उत्तम कवडे, गणपती कवडे, सुधाकर कवडे यांच्यासह अन्य आठ ते दहा जण.