आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Damaniya Says Sunil Kendrekar And Tukaram Munde AAP Loksabha Candidate

लोकसभेसाठी सुनील केंद्रेकर, तुकाराम मुंढेंना ‘आप’चे साकडे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जनतेला हवा असेल त्यालाच आम आदमी पार्टीकडून उमेदवारी दिली जाईल. बीडमधून तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर, तर जालना येथून तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना लोकसभेसाठी उमेदवारी द्यावी, अशी जनतेची मागणी आहे. त्यासाठी येत्या जानेवारीत दोन्ही अधिकार्‍यांना भेटणार असल्याचे आपच्या प्रदेश समन्वयक अंजली दमानिया यांनी सांगितले.
दरम्यान, मुंढे यांनी निवडणूक लढवावी, यासाठी 10 हजार नागरिकांनी अर्ज भरून दिला आहे. येत्या 10 जानेवारीला त्यांच्या मुंबईतील घरी जाऊन उमेदवारीबाबत साकडे घालू. ते तयार झाले नाहीत तर 11 रोजी पुन्हा भेट घेऊ, मुंढेंना उमेदवारीचे साकडे घालण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी यावे, असे आवाहन दमानिया यांनी केले.
शहरातील कै. नागोजीराव सतकर शाळेच्या प्रांगणात मंगळवारी झालेल्या मेळाव्यात बोलताना दमानिया म्हणाल्या, लोकसभा व विधानसभेसाठी उमेदवार निवडीचे आवाहन आम्ही लोकांनाच करत आहोत. देशाचे चित्र बदलण्यासाठी व देशसेवेसाठी चांगल्या लोकांनी पक्षात येऊन काम करावे, असे आवाहन दमानिया यांनी केले.
पुढील स्लाइडमध्ये, केंद्रेकर अनुकूल, पत्नीचा विरोध