आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dananjay Munde Contests Against Pankaja Munde, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकेकाळचा प्रचारप्रमुख झाला प्रतिस्पर्धी!, परळीत पंकजांविरुद्ध धनंजय मुंडेंची लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - मागील निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सहा महिन्यांपासूनची जय्यत तयारी ऐनवेळी धुळीस मिळालेली असताना पंकजा मुंडे यांना आमदार करण्यासाठी प्रचाराची सारी सूत्रे एकवटून हाती घेणारे बंधू धनंजय मुंडे या निवडणुकीत प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात उतरणार आहेत.गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर २००९ मध्ये लोकसभा लढवताना धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले.
भाजपकडून उमेदवारी निश्चित असल्याचेही स्पष्ट झाले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातील अनेकानेक गावांत संपर्क वाढवत विकासकामांवर अधिक भर दिला. प्रचार मोहीम राबवायला सुरुवात केली; परंतु २००९ मध्ये विधानसभा निवडणूक लागताच ऐनवेळी भाजपच्या यादीत परळीतून धनंजय मुंडे यांच्याऐवजी गोपीनाथ मुंडे यांनी कन्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे धनंजय मुंडे मनोमन दुखावले. मात्र, त्यांनी हे दु:ख बाजूला सारून भगिनी पंकजा यांच्या प्रचाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. पंकजा मुंडे मताधिक्याने विजयी झाल्या.

विधानसभा निवडणुकीनंतर मुंडे कुटुंबीयांत बिनसल्याने पंडितअण्णा मुंडे व धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंपासूनच नव्हे तर भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादीत दाखल झाले. विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत फेरनिवडणुकीत विजयी झाले आणि गोपीनाथ मुंडे- पंकजा मुंडे यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी बनले. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे होणा-या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार नाही, परंतु विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात बंधू धनंजय मैदानात आहे.