आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DANAVE COMMITTED FOR THE VIKAS PRADHIKARAN TO AURANGABAD JALANA

जालना-औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापणार : दानवे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- डीएमआयसी ड्राय पोर्ट या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे जालना आणि औरंगाबाद शहरांचा झपाट्याने विकास होणार आहे. त्यासाठी लवकरच औरंगाबाद-जालना विकास प्राधिकरण स्थापन केले जाणार असून यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली. येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानिमित्त खासदार दानवे यांचा शहरात सत्कार करण्यात आला. या वेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे, माजी आमदार विलासराव खरात, अरविंद चव्हाण, तुकाराम जाधव, अनिरुद्ध खोतकर, भास्कर दानवे, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, भास्कर अंबेकर, रिपाइंचे अॅड. ब्रह्मानंद चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बाेलताना दानवे म्हणाले, मराठवाड्याचा विकास व्हावा यासाठी आपण राज्य सरकारकडे औरंगाबाद-जालना विकास प्राधिकरणाची मागणी केली आहे. शेंद्र्याजवळील डीएमआयसी प्रकल्प आणि जालन्याजवळ होत असलेल्या ड्राय पोर्ट प्रकल्पामुळे या दोन्ही शहरांतील अंतर २२ िकलोमीटर इतकेच असणार आहे. त्यामुळे पुढील दहा वर्षांत हे अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, त्यामुळे ही दोन्ही शहरे जुळी शहरे म्हणून पुढे येतील. या शहरांमधील दळणवळण सुविधा अधिक सोयीस्कर असावी यासाठी औरंगाबाद-जालना विकास प्राधिकरणच्या माध्यमातून मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्राथमिक चर्चेत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे दानवे म्हणाले.

शेतकरी-उद्योजकांनाजगवा
दुष्काळामुळेशेतकरी अडचणीत आहे, तर विजेचे दर वाढल्याने जालन्यातील स्टील उद्योग अडचणीत सापडला आहे. कारखाने बंद होत असल्याने २५ हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे उद्योग आणि शेतकरी जगतील यासाठी सरकारने भूमिका घेणे आवश्यक असल्याचे आमदार खोतकर याप्रसंगी बोलताना म्हणाले. त्याशिवाय शहरात भूमिगत गटार योजना कार्यान्वित करण्याची मागणी त्यांनी केली.

शिवसेना सरकारच्या पाठीशी उभी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची खासदार दानवे यांच्यासाठी भाग्यशाली आहे, असे सांगत आमदार अर्जुन खोतकर यांनी दानवे यांना मुख्यमंत्रिपद मिळू शकते असे सूचित केले. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस सरकारचे, तर आपण पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने करीत आहोत. शिवाय सरकारला शिवसेनेचाही पाठिंबा आहे, असे खासदार दानवे यांनी या वेळी सांगितले.