आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ते कुजलेले मृतदेह दीर-वहिनीचेच, प्रियंकाचा होता प्रेमविवाह, गुढ कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - जिल्ह्यातील माहूर शहरातील दत्तमांजरी रस्त्यावर असलेल्‍या गरूडगंगा नाल्यापुढील डोंगरात कुजलेल्या अवस्थेत दोन मृतदेह आढळले नि एकच खळबळ उडाली. हे मृतदेह दीर-वहिनीचे असल्याचे समोर आले आहे. दोन दिवस उलटले तरी या प्रकरणाचे गुढ कायम आहे.
या दीर- वहिनीने आत्महत्‍या केली की, त्‍यांची हत्‍या झाली याविषयीही अजून संशय व्‍यक्‍त केला जात आहे. पोलिसांनी दोन्‍ही शव तपासणीसाठी नांदेडला पाठवले आहेत. घटनास्‍थळाहून आधारकार्ड व ओळखपत्र पोलिसांना मिळाले त्‍यानुसार हे दोन शव प्रियंका होलगे व सुहास होलगे यांचे असल्याचे निष्पन्न झाले.

मृत प्रियंका होलगे हिच्या पतीचे नाव सतीश होलगे आहे. त्‍याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीसाठी माहूरला आणले. ही घटना उघड झाल्‍यानंतर प्रियंकाचे आई-वडिल व सुहासचेही आईवडीलही माहूर येथे दाखल झाले. मृतदेहाजवळील पुराव्‍याच्‍या आधारे पोलिस तपास करत आहे. विशेष म्‍हणजे प्रियंका आणि पती यांचे कॉलेज जिवनापासून प्रेम होते. त्‍यांनी प्रेमविवाह केला होता.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, प्रकरणाशी संबंधित काही बाबी..