जालना - जिल्ह्यातील अंबड शहरात ITI जवळ एका अवघ्या 19 वर्षीय मुलाचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. या मुलाचे नाव गोविंद गगराणी असल्याचे समोर आले आहे. तो जालन्यातील एका घाऊक किराणा व्यापाऱ्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याचा मृतदेह अतिशय वाईट अवस्थेत सापडला आहे. त्याच्या मृतदेहाची अवस्था पाहता घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे, हा मुलगा रविवारी रात्रीपासूनच बेपत्ता होता.