आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाल फाट्यावर वरूडच्या युवकाचा मृतदेह अाढळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री - तालुक्यातील पाल फाट्यालगत २३ वर्षीय युवकाचा मृतदेह मंगळवार (दि.१३) रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास आढळून आला आहे.मृताचे नाव मधुकर शामराव थोरात (रा.वरुड पिंप्री, ता. सिल्लोड) असे आहे.

याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील पाल फाट्यालगत असलेल्या एका मंदिराजवळ मंगळवारी रात्री दहा वाजता बेशुद्धावस्थेत एका तेवीसवर्षीय अनोळखी युवक पडून असल्याची माहिती फुलंब्री पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, सहायक पोलिस निरीक्षक गोरख शेळके, पो.हे.कॉ. डी. डी. निकम यांनी घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्ध असलेल्या युवकास फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सदर युवकाच्या डोक्याला जबरमार लागला असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शिवराईत विषारी द्रव घेऊन आत्महत्या
वैजापूर | शिवराई येथील विषारी औषध प्राशन केलेल्या ५० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घाटी रुग्णालयात घडली. कैलास किसन बोरसे ५० असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. कैलास यांनी बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. ग्रामस्थांच्या मदतीने कुटुंबीयांनी त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
बातम्या आणखी आहेत...