आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूमुळे नागडगावच्या बालकाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - तालुक्यात डेंग्यूचा उद्रेक आरोग्य विभाग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत असतानाच नागडगांवमध्ये पुन्हा एका सात वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गणेश रामनाथ कळसे असे मुलाचे नाव असून याबाबत आरोग्य विभाग मात्र अनभिज्ञ आहे.

माजलगाव शहरासह तालुक्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढली आहे. नागडगाव येथील गणेश रामनाथ कळसे (७) याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला डेंग्यूचे निदान होताच बीड येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. २ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी याबाबत आपण माहिती घेत
असल्याचे सांगितले.
जागृतीचा अभाव
दरम्यान, तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत मात्र जनजागृतीचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणीही जोरकसपणे करण्याची गरज आहे.
बातम्या आणखी आहेत...