आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Department Of Health,Latest News In Divya Marathi

आयसीयूची वाटही खडतर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज अनेक गंभीर रुग्ण येतात. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येते. मात्र, अतिदक्षता विभागात जाण्यासाठी असलेल्या मार्गात नवीन बेड ठेवल्याने रुग्णांना घेऊन जाण्यासाठी आणि आणण्यासाठी अडचण होत आहे. तोल जाऊन एखाद्यावेळी रुग्ण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अतिदक्षता विभाग अडचणीत
जिल्हा सामान्य रुग्णलयात नवीन बेड आणले आहेत. सध्या ते जोडण्याचे काम सुरू आहे. अतिदक्षता विभागात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यातच हे जोडणीचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेकवेळा गंभीर रुग्णांना स्ट्रेचर आणि व्हील चेअरवरून उतरवून चालत घेऊन जावे लागते. मात्र, रस्त्यात ठेवलेल्या बेडमुळे रुग्णांना घेऊन जाणे अवघड झाले आहे.
बेड रस्त्यात असल्याने अडचण
अतिदक्षता विभागात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यात बेड ठेवलेले असल्यामुळे रुग्णाला घेऊन जाण्यास अडचणी येतात. काहींना स्ट्रेचरवरून खाली उतरावे लागते; मात्र माझे नातेवाईक गंभीर असल्याने त्यांना कसरत करून घेऊन जावे लागले. स्ट्रेचरवरून पडता पडता ते दोन वेळा वाचले. सचिन राजपूत, रुग्णाचे नातेवाईक