आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deputy Chief Minister Ajit Pawar, Latest News In Divya Marathi

बेळगाव केंद्रशासित प्रदेश करावा: अजित पवारांचे शिष्‍टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूरच्या नागरिकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा राज्य शासनाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तिथल्या नागरिकांच्या भावना समजून घेण्यासाठी पंतप्रधानांच्या शिष्टमंडळाने भेट द्यावी, अशी राज्य मंत्रिमंडळाने मागणी केली आहे. मात्र, सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्या भागातील नागरिकांवर वारंवार होणारा अन्याय विचारात घेऊन प्रश्न सुटेपर्यंत हा भाग केंद्र शासनाच्या अखत्यारीत ठेवावा, अशी राज्य सरकारची मागणी असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली.
निर्धार मेळाव्यानिमित्त शुक्रवारी ते उस्मानाबादेत आले होते. विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्याच्या काही भागात पाणीटंचाईचे संकट आहे. मराठवाड्यात गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 29 टक्के पाणीसाठा होता. या वर्षी हा साठा 15 टक्क्यांवर आला आहे. राज्यामध्ये गतवर्षी 65 टक्के पाणीसाठा होता. या वर्षी 47 टक्क्यांपर्यंत आहे. काही भागात स्थिती समाधानकारक असली तरी मराठवाड्यातले पाच प्रकल्प अद्याप कोरडे आहेत. टंचाईच्या उपाययोजनेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून 15 ऑगस्टपर्यंत पाऊस न झाल्यास कळंब, परंडा शहरांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. वारंवार येणा- या दुष्काळानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांसाठी 191 कोटी 84 लाख रुपयांची मदत राज्य सरकारने दिली असून ही मदत शेतक- यांच्या खात्यावर जमा केली आहे.

सार्वजनिक जीवनात सांभाळून बोलणे गरजेचे-
फटकळ बोलण्यामुळे आत्मक्लेश करावा लागलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी लातूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्याच पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. त्रिपाठी यांनी काँग्रेसला आघाडी सरकार चालवायची अक्कल नाही, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल पवार म्हणाले की, त्रिपाठी राष्ट्रीय स्तरावरील नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावर माझ्यासारख्या राज्य स्तरावरच्या नेत्याने बोलणे योग्य नाही; पण सार्वजनिक जीवनात बोलताना समोरच्याचा सन्मान राखणे आवश्यक आहे, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे पवार म्हणाले.
सीमावादावर बोलताना त्यांनी राज्य शासनाने कर्नाटकचा निषेध केला आहेच, पण याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कैफियत मांडणार असल्याचे पवार यांनी सांगितले. लातूरमधील विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. पंधरा दिवसांनी पाणी दिले जाते याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. पर्यायी योजनेविषयीचा प्रस्ताव आला असून त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार म्हणाले.