आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमी अभिलेख उपअधीक्षकास शेतकऱ्याकडून मारहाण; शेतकऱ्यानेही केली मारहाणीची तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- अंबाजोगाई येथील  येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे  उपअधीक्षक जी. टी. जाधव यांना राडी येथील शेतकऱ्याने मंगळवारी सकाळी दहा वाजता बसस्थानकात बेदम मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. तर जमीन मोजणीप्रकरणी विचारणा केली म्हणून जाधव यांनीच मारहाण केल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. दरम्यान, या मारहाणप्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी कर्मचारी बुधवारी काम बंद आंदोलन करणार आहेत.  

भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक जी. टी. जाधव हे कामानिमित्त मंगळवारी सकाळी दहा वाजता  बाहेरगावी जाण्यासाठी अंबाजोगाई येथील  बसस्थानकात आले होते. या वेळी राडी येथील मधुकर राजाराम पांडे हा शेतकरी बसस्थानकात आला. त्याने जाधव  यांना  मारहाण केली. जिवे मारण्याची धमकीही दिली,  अशी तक्रार जाधव यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.  चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र गंदम यांनी सांगितले आहे.  

मोजणीसाठी शेतकऱ्याचे हाल  
तीन वर्षांपूर्वी जमीन मोजणीसाठी मधुकर पांडे यांनी  शुल्क भरले आहे. तीन वेळेस वेगवेगळी मोजमापे काढून देण्यात आली.  शेतकऱ्याने   पुराव्यासहित जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी  मोफत मोजणी करून देण्याचे आदेश दिले.  १७ मार्च रोजी अंबाजोगाई  उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर  शेतकऱ्याने उपोषण केले होते. तेव्हा  उपजिल्हाधिकाऱ्यांनी  २० मार्चपर्यंत भूमी अभिलेख कार्यालयास अहवाल देण्यास सांगितले.
बातम्या आणखी आहेत...