आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांवर करतात देशी दारूची फवारणी, फक्त 5 रुपयांत झाडांना मिळते टॉनिक, हे आहेत फायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगाव अर्ज - फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज परिसरात पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा कपाशी व सोयाबीन पिकावर फवारणी करत आहे. परंतु महागडी कीटकनाशके वापरण्यापेक्षा फवारणीकरिता देशी दारूचा वापर केला जात आहे.
पिकांच्या टॉनिकसाठी प्रतिटाकी फवारणी ४० रुपये, तर देशी दारू घटक फवारणीसाठी केवळ ५ रुपयांचा प्रति टाकी खर्च येत असल्याने पिकांवर शेतकरी मोठ्या प्रमाणावर देशी दारूची औषध फवारणी करत आहेत. त्यामुळे शिवारभर दारूचा गंध दरवळत आहे. देशी दारूची पिकांसाठी फवारणी म्हणजे पिकांसाठी टॉनिक असल्याचे सांगितले जात असून ही फवारणी केवळ भाजीपाल्यासाठी पोषक ठरत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
रासायनिक खते व कीटकनाशकांचे दर गगनाला भिडले आहेत. भाववाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सतत महिनाभर पावसाने हजेरी लावल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सध्या फवारणीची कामे सुरू आहेत. यात काही शेतकऱ्यांनी कमी खर्चात फवारणी करण्याकरिता देशी दारू प्रति पंप १०० मि. ली. टाकून फवारणी सुरू केली आहे. कपाशीवर हा प्रयोग जास्त प्रमाणात होत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, देशी दारूचे पिकांसाठी फायदे, किती येथे खर्च व काय म्‍हणतात लोक..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...