आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखमोलाची ठेव: टागोरांच्या आशीर्वादाची फुले ८१ वर्षांपासून जपली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - हैदराबाद येथे १९३४ मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या उपस्थितीत झालेल्या कविसंमेलनात परळी येथील कवी त्र्यंबक जयवंतराव देशपांडे यांनी टागोर यांना उद्देशून "रान फूल का चढावा' ही कविता लिहिली. टागोरांना ही कविता भेट देताच त्यांनी कवितेबरोबर माय आशीर्वाद अशी स्वाक्षरी देत त्यांचा सन्मान केला. कवितेची प्रत व स्वाक्षरी अशी ही आशीर्वादाची फुले परळी येथील देशपांडे कुटुंबाने ८१ वर्षांपासून जपली आहेत.

परळी शहरातील देशपांडे गल्लीतील शिक्षक जयवंतराव देशपांडे यांच्या पोटी जन्मलेले कवी त्र्यंबक देशपांडे त्याकाळी गंगाखेड येथे महसूलचे वसुली अधिकारी म्हणून कार्यरत होते. नोकरी सांभाळत त्यांनी कवितांचा छंद जोपासला. १९३४ मध्ये हैदराबाद येथे आयोजित कविसंमेलनासाठी देशपांडे हैदराबाद येथे गेले.

निझाम आला हजरत निझाम यांच्या काळात झालेल्या कविसंमेलनात देशपांडे यांनी टागोर यांना उद्देशून "एक रान फूल का चढावा' ही २० ओळीची कविता लिहिली होती. या कविसंमेलनाला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर उपस्थित होते. टागोर यांना देशपांडेंनी ही कविता भेट दिली. कविता वाचून आनंदीत झालेल्या टागोरांनी त्र्यंबक देशपांडे यांचे कौतुक करत "माय आशीर्वाद' असा शेरा देत स्वाक्षरी केली. विशेष म्हणजे हैदराबाद येथील यमनत सल्तनतचे वजीरे अाझम सर किशन प्रसाद यांच्या दरबारी कवी त्र्यंबक देशपांडे यांचा सत्कारही करण्यात आला होता. आठवणींचा हा ठेवा देशपांडे कुटुंबीयांनी जपला आहे.

देशपांडे कुटुंबाने जपला ठेवा
त्र्यंबक देशपांडे आणि लक्ष्मीबाई यांना सात अपत्ये झाली. प्रभाकर व मार्तंड हे दोन शिक्षक मुले व कमलाबाई, शांताबाई, लीलाबाई, कमल व सिंधु या पाच मुली आहेत. २४ ऑगस्ट १९७९ रोजी वृद्धापकाळाने त्र्यंबक देशपांडे यांचे निधन झाले. ३६ वर्षापासून त्यांच्या कुटुंबाने आजोबांची कविता व स्वाक्षरी जपून ठेवली आहे. त्यांचा मुलगा प्रभाकर यांनी इंग्रजी व्याकरणावर पुस्तक लिहिले आहे, तर नातू सचिन देशपांडे यांनी संस्कृतमधील व्याकरणावर संस्कृत वाचा व शिका हे पुस्तक व श्रीरंग एक काव्यतरंग हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे.