आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devastation Claimed 20 And 70 Villages Diappeared

महाप्रलयात 20 हजार बळी, तर 70 गावे नामशेष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - प्रलयात यात्रेकरू, स्थानिकांसह 20 हजार जणांचे बळी गेले असावेत, अशी भीती केदारपीठाचे जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी मंगळवारी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, केदारनाथसह सुमारे 70 गावे नामशेष झाली. दर सहा महिन्यांनी मंदिर उघडण्यासाठी जाताना आम्ही थांबत होतो, ती ठिकाणे मैदाने झाली आहेत. यात्रेकरूंची ने-आण करण्यासाठी केदारपीठाजवळ 25 हजार खेचरे होती. यातील 15 हजार खेचरे वाहून गेली.


मदतकार्याला विलंब : खराब हवामानामुळे मदतकार्य पोहोचू शकत नाही. त्यामुळे केदारनाथाजवळ साचलेला गाळ उपसणे, मृतदेहांची विल्हेवाट लावणे या कामाला उशीर होत आहे. उखीमठातून केदारनाथ व बद्रीनाथाला जाण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करणे गरजेचे आहे, असेही शिवाचार्य म्हणतात.
तातडीने अन्नपाणी पुरवणे गरजेचे : केदारनाथ आणि आजूबाजूच्या गावांतील लोकांचे सर्वस्व पुरात वाहून गेले. जे कसेबसे बचावले, त्यांच्या खाण्यापिण्यासाठी शिल्लक काहीही उरले नाही. आधी या लोकांसाठी अन्नधान्य, औषधे, पिण्याचे पाणी या मूलभूत गरजा पोहोचवणे आवश्यक आहे.


उखीमठात प्रतिष्ठापना : केदारनाथाच्या पूजेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी उखीमठात करण्यात आली. महाप्रलयानंतर केदारनाथाचा मार्ग पुन्हा पूर्ववत होईपर्यंत आता हे केदारपीठ उखीमठातच राहणार आहे. शिवाचार्य मंगळवारी उखीमठातून डेहराडून येथे पोहोचले. तेथूनच त्यांनी ही माहिती दिली.


कोण हे शिवाचार्य महास्वामी
> मूळ कर्नाटकातील रहिवासी. सोलापूरच्या जंगम भिक्षू प्रशिक्षण संस्थेत प्राथमिक शिक्षण. 1982 मध्ये काशी विद्यापीठातून एम.ए. संस्कृतची पदवी घेऊन शिराढोणला परतले.

> शिराढोण येथे धार्मिक व सामाजिक क्षेत्रात योगदान, दारूबंदीचे कार्य.

> सन 2000 मध्ये केदारपीठाचे जगद्गुरु म्हणून नेमणूक. मूळचे श्री षडाक्षर शिवाचार्य शिराढोणकर हे नाव बदलून श्री श्री श्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी केदारजगद्गुरु असे नामाभिधान.