आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी खोटारडे; देवेंद्र फडणविसांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन डागाळलेल्यांना उमेदवारी देणार नाही असे जाहीर केले. आदर्श प्रकरणात आरोपी असणार्‍या अशोक चव्हाणांना उमेदवारी दिली. राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड होऊन त्यांचा खरा चेहरा मतदारांसमोर आला आहे. भ्रष्ट आणि खोटारड्या काँग्रेस आघाडीचे दिवस आता भरले आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भोकर येथे केली. महायुतीचे उमेदवार डी. बी. पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

काँग्रेसने 56 वर्षांच्या भ्रष्ट राजवटीत गरिबांना गरीब ठेवले. त्यांच्या योजना या सर्वसामान्यांसाठी नसून पुढार्‍यांच्या हितासाठी आहेत. काँग्रेस आघाडीच्या राज्यात शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी कोणीही सुखी नाहीत. देशाला आता खर्‍या अर्थाने परिवर्तनाची गरज आहे. परिवर्तनाची चळवळ सुरू झाली आहे. या चळवळीत सहभागी होऊन डी.बी. पाटील यांना विजयी करा, असे आवाहन फडणवीस यांनी केले. याप्रसंगी बोलताना डी.बी. पाटील म्हणाले, माझ्याविरोधात पैशाने मजबूत असलेले उमेदवार उभे आहेत.

माझी संपत्ती मतदारच आहेत. आपण मॅनेज झालो असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे. या आरोपात कोणतेही तथ्य नाही, असेही डी. बी. पाटील म्हणाले.