आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devgiri Express Daroda On Jalana District Partur Station

देवगिरी एक्स्प्रेसवर परतुरजवळ दरोड्याचा प्रयत्न, आठ दरोडेखोर जेरबंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- जिल्ह्यातील परतूर स्टेशनजवळ रविवारी रात्री देवगिरी एक्स्प्रेसवर दरोड्याचा प्रयत्न झाला असून स्थानिक पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने दरोडेखोरांना जेरबंद केले आहे.

हैदराबादहून मुंबईला जाणा-या देवगिरी एक्स्प्रेसवर जालना जिल्ह्यातील परतूर स्टेशनजवळ रविवारी रात्री 10.30 ते 11 वाजताच्या दरम्यान आठ जणांनी दरोड्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी प्रवाशांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. त्याचवेळी आरपीएफचे जवान तिथे दाखल झाल्याने त्यांना पकडण्यात यश आले. दरोडेखोरांनी पोलिसांवरही हल्ला केला. यात आरपीएफचे दोन जवान जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

स्थानिक पोलिस आणि आरपीएफ जवानांनी आठही दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्यावर परतुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आठही जणांना औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.