आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीपीडीसी बैठकीत मुंडेंची भाऊबंदकी बीडला उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये प्रमुख भूमिका निभावणार्‍या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना शुक्रवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांसह भाजप आमदार जिल्हाधिकार्‍यांशी सल्लामसलत करत बसल्याचा आरोप करत आमदार धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकून सभागृहातून निघून गेले.

दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी आणि जनतेला यातून सावरण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे पालवे तब्बल दीड तास उशिराने येतात. भाजप आमदारांसोबत चर्चेत वेळ घालवणार्‍या पालकमंत्र्यांना वेळेचे आणि दुष्काळाचे भानच नाही, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संधान साधले. बैठक सुरू करण्याला पालकमंत्री दिरंगाई करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, अमरसिंह पंडित यांनी बैठकीवर बहिष्कार घातला.

हे तर बहिष्काराचे नाटकच
पंधरा वर्षे सत्तेत राहून काय विकास साधला? गत पाच वर्षांत पालकमंत्र्यांनी जेवढ्या बैठका घेतल्या नाही तेवढ्या मी तीन महिन्यांत घेतल्या. भ्रष्टाचार अन् बँकेचे हप्ते चुकवणारे बहिष्काराचे नाटक करण्याशिवाय काय करू शकतात, असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

वेळ‌ेला महत्त्व असते ना ?
बीड तालुक्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून शेतकर्‍यांना मदत उपलब्ध करून देण्यासह व इतर प्रश्नांवर आम्ही चर्चा केली; परंतु पालकमंत्री पंकजा मुंडे बैठकीसाठी उशिराने आल्याने आम्ही बहिष्कार टाकल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.