आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फडणवीसांनी गायीची धार काढून दाखवावी - धनंजय मुंडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगतात की, मी पाच पिढ्यांचा शेतकरी आहे, गायीच्या दुधाची धार काढून दाखवतो. आमच्या पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिल्यास मी मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा' बंगल्यावर गाय घेऊन जाईन, त्यांनी धार काढून दाखवावी, असे आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी वसमत येथे दिले.

धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दुष्काळग्रस्त आरळ, एकरुखा, चिखली आणि सातेफळ या गावांची पाहणी केली. यानंतर वसमत येथे आयोजित सरपंच, उपसरपंच प्रशिक्षण मेळाव्यात शेतकर्‍यांशी संवाद साधला. या वेळी मुंडे यांनी राज्यातील स्थिती गंभीर असल्याचे सांगून सरकारला कोणत्याही स्थितीत दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्यास भाग पाडू, असे
ठासून सांगितले.

महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील जनता आज दुष्काळी स्थितीमुळे त्रस्त असताना भाजपचे नेते मात्र शेतकर्‍यांची थट्टा करत आहेत. हे सरकारच पांढर्‍या पायांचे असून त्यांना वठणीवर आणण्यासाठी हातात रुमणे घ्या, या शब्दांत त्यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला.

राज्य सरकारने सत्तेत आल्यावर एकच काम केले आणि ते म्हणजे शेतकर्‍यांच्या मालाचे भाव पाडले आणि जनतेला बुरे दिन आणले. आम्ही ७० हजार कोटींची एलबीटी माफ केली. या सरकारला ७ हजार कोटींचे शेतकर्‍यांचे कर्ज माफ करता येत नाही का, असा सवाल करून मुंडे यांनी या सरकारला वठणीवर आणण्यासाठी १४ सप्टेंबरला तयार राहण्याचे आवाहन केले. या दिवशी शेतकर्‍यांसह त्यांच्या जनावरांचेही भव्य असे जेलभरो आंदोलन करून सरकारला जनतेची ताकद दाखवली जाईल.