आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार मुंडेंचे वादग्रस्त वक्तव्य; आयोगाला अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई - मागील लोकसभा निवडणुकीत मी भाजपसाठी बोगस मतदान केले, परंतु या वेळी ते होऊ देणार नाही, असे आमदार धनंजय मुंडे यांचे वक्तव्य प्रशासनासाठी डोकेदुखी ठरले आहे. रविवारी या भाषणाचे रेकॉर्डिंग व अहवाल महसूल, पोलिस प्रशासनाने निवडणूक आयोगाला पाठवला आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे लोकसभा निवडणुकीतल उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचाराचा प्रारंभ केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते गेवराईत शनिवारी झाला.

या जाहीर सभेत आमदार धनंजय मुंडे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत मी भाजपासाठी बोगस मतदान केले. परंतु या वेळी तसे होऊ देणार नाही, असे वक्तव्य केले. या संपूर्ण भाषणाचा तसेच सभेचे व्हिडीओ फुटेज, व अहवाल पोलिस, महसूल प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे.

आमदार मुंडे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रशासन अचणीत आले असून तत्कालीन जिल्हाधिकारी व सर्व सहायक निवडणूक अधिकारी यांच्यासह धंनजय मुंडे व गोपीनाथ मुंडे यांना याबाबत खुलासे सादर करावे लागणार आहेत. जिल्ह्यात याच प्रकाराची चर्चा सुरू आहे.