अंबाजोगाई तालुक्यातील तळणी येथील शेतकरी मुंजा किशनराव गिते यांनी याचिका दाखल केली. त्यांची गट क्रमांक ३८ मध्ये ३ हेक्टर १२ आर शेतजमीन होती. २०१२ मध्ये मुंडे यांनी तेथे जगमित्र सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची घोषणा केली. गिते यांच्याकडून शेतीही संपादित करण्यात आली. ७ जून २०१२ ला खरेदीखत झाले. त्यात गिते यांना आधी १० लाख रुपये रोख, नंतर ४० लाख रुपये तर घरातील चार सदस्यांना कारखान्यात नोकरी देण्यात येणार होती. मुंडेंनी कारखान्याच्या खात्यातून गितेंच्या बँक खात्यात ७ लाख ८१ हजार २५० रुपये वर्ग केले. त्यानंतर एक लाख रुपयांचा धनादेशही वटला. पण १ लाख १९ हजार रुपये येणे बाकी होते. चार महिन्यानंतर नोकऱ्याही गेल्या.
धनंजय मुंडे यांनी दिलेला ४० लाख रुपयांचा धनादेश वटला नाही. त्यामुळे गितेंनी मुंडे, वाल्मीक कराड, सूर्यभान मुंडेंविरोधात तक्रार दिली होती. नंतर पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्र्यांकडे या बाबतचा तक्रार अर्ज दिला. तरीही या प्रकरणी कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली. गितेंतर्फे अमरजितसिंह गिरासे व योगेश बोलकर यांनी बाजू मांडली