आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पानमळा'ला दिली धनंजय मुंडेंनी भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव- पद्मश्रीना.धों. महानोर यांच्या पळसखेडा येथील "पानमळा' या निवासस्थानी १० मे रोजी रात्री साडेआठ वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट दिली.
बुधवारी (६ मे) रात्री महानोर यांच्या "पानमळा' या निवासस्थानावर अज्ञात चोरट्यांनी चार खोल्यांचे कुलूप तोडून धुडगूस घातला. यावर रविवारी मुंडे यांनी भेट देऊन घराची पाहणी केली.
घरातील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या नाहीत. चोरट्यांचा हेतू महानोरांना ठार मारण्याचा होता. ही एक विचारांची लढाई आहे. महानोररूपी चांगले विचार संपवण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत मुंडे यांनी या वेळी व्यक्त केले.
पळसखेडा येथे येण्यापूर्वी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे बोलणे झाले असल्याचे सांगितले. पद्मश्री कविवर्य ना. धों. महानोर यांना गृह खात्याने २४ तास पोलिस सुरक्षा दिली पाहिजे ही माझी मुख्य मागणी अाहे. सुरक्षा पुरवण्याविषयी मी राज्य शासनाला धारेवर धरणार असल्याचे मुंडे यांनी या वेळी सांगितले. मुंडे रविवारी रात्री साडेआठ वाजता आले होते. याबाबत पालकमंत्री रामदास कदम यांनी लक्ष द्यायला पाहिजे. महानोरांकडे दरोड्याची घटना होऊन तीन दिवस झाले. या प्रकरणी धीर देण्यासाठी भेटदेखील दिली नसल्याची टीका मुंडेंनी केली.
गृहराज्यमंत्र्यांनी केला सहा तासांनंतर फोन
महानोरांनीगृहराज्यमंत्री राम शिंदेंच्या स्वीय सहायकाला दूरध्वनी करून मला महत्त्वाचे बोलायचे असल्याचे सांगितले. परंतु स्वीय सहायकाने शिंदे महत्त्वाच्या बैठकीत असल्याचे सांगितले. यानंतर सहा तासांनी शिंदेंनी महानोरांना फोन करून विचारपूस केली. हे कृत्य प्राध्यापकाला शोभण्यासारखे नाही. शेजारील मंत्री एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांचे गाव पळसखेड्यापासून जवळच आहे. किमान महानोर यांची भेट घ्यायला हवी होती, असे सांगत आैरंगाबाद पोलिस परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांना या गुन्ह्याबाबत तपास करण्यात यावा, अशा सूचना मुंडे यांनी केल्या.
बातम्या आणखी आहेत...