आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसंगावधानाने ५० वारकरी बचावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर - पंढरपूरहून ५० वारकऱ्यांना मेहकरकडे घेऊन निघालेली बस धारूर घाटात आली तेव्हा दुचाकीस्वार आडवा आल्याने बस थेट दरीत कोसळण्याच्या मार्गावर होती. बसचालकाने प्रसंगावधान दाखवल्याने वारकऱ्यांचे प्राण वाचले. हा अपघात शनिवारी सकाळी दहा वाजता घडला.
पंढरपूरहून शनिवारी सकाळी बस (एमएच ९६८१) मेहकरकडे धारूर मार्गे निघाली हाेती. सकाळी दहा वाजता बस धारूर घाटात आल्यानंतर दुचाकीस्वार बसला आडवा आला. त्या वेळी बस थेट दरीतच कोसळण्याच्या मार्गावर होती, परंतु बसचालक संतोष केशव मापारी यांनी प्रसंगावधान रोखून भरधाव बस घाटाच्या सुरक्षित भिंतीकडे वळवली. तेव्हा बस थेट भिंतीच्या खडकावर जोरात आदळली. या बसच्या समाेरच्या भागाचे नुकसान झाले. चालकाच्या सतर्कतेमुळे ५० प्रवाशांचे प्राण वाचले. या प्रकरणी बसचालक मापारी यांनी धारूर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बसचे नुकसान झाल्याचे नोंद झाली आहे. बसमध्ये वाहक म्हणून बी.पी.आडे होते. दुपारी दोन वाजेपर्यंत बस घाटात होती. या बसमध्ये धारूर, माजलगाव, पाथरी, परभणी येथील प्रवासी होते. सुदैवाने ते सुरक्षित राहिले.
बातम्या आणखी आहेत...