आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोकी येथे पोलिस कोठडीतून 5 आरोपी पळाले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - ढोकी पोलिस ठाण्याच्या कोठडीत असलेले घरफोड्यांच्या गुन्ह्यातील पाच आरोपी स्वच्छतागृहाच्या खिडकीचे गज तोडून पळाले. बुधवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पिंटू ऊर्फ भारत राजेराव पवार (22), रवींद्र शामराव काळे (32), कालिदास ऊर्फ विलास बाबू पवार (20), सुरेश ऊर्फ अब्बास शिवा पवार (20, सर्व रा. कळंब) आणि दादा ऊर्फ श्रीमंत उमराव पवार (20, रा. भाटशीरपुरा, ता. कळंब) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांनी कळंब येथील शिक्षक विजय तांबारे यांचे घर फोडले होते. अन्य एका घरफोडीतही ते आरोपी होते. न्यायालयाने या सर्वांची उस्मानाबादच्या कारागृहात रवानगी केली होती.