आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Differences Forgeting And Unionimusly Celebrating Shiv Birth Aniversary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतभेद विसरून शिवजयंती होणार साजरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा - शहरात प्रथमच सर्व जाती-पंथाचे लोक सामाजिक व राजकीय मतभेद विसरून एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची सार्वजनिक शिवजयंती साजरी करीत आहेत़ यापूर्वी शहरात विविध पाच शिवजयंती उत्सव साजरे केले जात होते़ त्या सर्व मंडळांना एकत्रित करून उमरगा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़

दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता विविध समाजातील 21 ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शिवाजी चौकात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक होणार आहे़ त्यानंतर 9 वाजता 1000 मोटारसायकली व ऑटोसह भव्य रॅली शहरातून काढण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे़ या मिरवणुकीमध्ये 1000 महिला शिवकालीन पारंपरिक वेषात नऊवारी साडी, इरकल साडी, डोक्यावर फेटे बांधून सहभागी होणार आहेत़

महिलांच्या हातामध्ये अबदागिरीमध्ये 20 महापुरुषांचे फोटो असणार आहेत़ या मिरवणुकीत 11 घोडे, पारंपरिक लमाण नृत्य, झांजपथक, लेझीम, हलग्या, तुता-या, भजनकरी मंडळी, ढोल, ताशे व शिवकालीन शस्त्रकौशल्य पथकाचा कार्यक्रम विविध कलापथक सादर करणार आहेत़ या मिरवणुकीमध्ये शिवप्रतिमेवर हेलिकॉप्टरने फुलाची उधळण करण्यात येणार आहे.