आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Different Types Of Flower Production In Khultabad

खुलताबादेत विविध प्रजातींची फुले बहरली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद । भरउन्हाळ्यात सध्या शासकीय कार्यालयात विविधरंगी उन्हाळी फुले बहरली आहेत. ही फुले कार्यालयांची शोभा वाढवत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. शासकीय कार्यालयासह परिसरातील घरे व हॉटेलमध्येही भरउन्हाळ्यात ही विविधरंगी फुले सर्वांचे आकर्षण बनली आहेत. एकीकडे उन्हाळ्यात हिरवळ कमी झालीतरी उन्हाळी फुलझाडे बहारदार दिसत आहेत.

वर्षाचे सहा ऋतू आहेत. त्यातील वसंत ऋतू हा महत्त्वाचा ऋतू आहे. या वसंत ऋतूमध्ये मार्च व एप्रिल महिन्यात रान शिवारातील औषधी वनस्पतीस फुले येतात. त्यामध्ये काटेसावर, पोखरमूळ, चित्रक घायटी तसेच दुसऱ्या जातीचे प्रामुख्याने गुलमोहर, पळस अशी हंगामी फुले या दोन महिन्यांत येतात. खुलताबाद शहरातील तहसील कार्यालय, नगरपालिका, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या झाडावर लाल, निळे, पिवळी, गुलाबी फुले सर्वांचे आकर्षण ठरत आहे.
शेवंती, चाफा, जास्वंदाची दरवळ
तालुक्यातील नंद्राबाद येथील शेतकरी विजय काळे यांनी गट नंबर ११६ मध्ये गलांडाची पाच एकरात लागवड केली असून याच गावातील मंगलबाई भिवसेन कोठुळे यांनीही गट नंबर २ मध्ये सुगंधित गुलाब, शेवंती, आसटक निशिगंध, चाफा, कलकत्ता झेंडू लिली, चमेली, मोगरा, कर्दळी, जास्वंद, गोकर्ण, गुलबेल गुलमोहरसह विविध सुगंधित फुलांची लागवड केली आहे. उन्हाळ्यात या फुलांची मागणी असून लग्नसमारंभ, सत्कार सोहळे व इतर कार्यक्रमांसाठी याचा वापर होतो.
पुढील स्लाइड्सवर पाहा अशीच काही प्रफुल्लित करणारी फुले...