आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपत्कालीन परिस्थितीत लढण्यासाठी 'यंग ब्रिगेड'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी व सामाजिक जबाबदारीचे पालन करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा विभागाअंतर्गत येणार्‍या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांतून यंग ब्रिगेड तयार करण्यात येणार आहे. या यंग ब्रिगेडला राज्यपाल भवनाकडून घेतल्या जाणार्‍या 'आव्हान' या उपक्रमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
विद्यापीठ व महाविद्यालय तसेच जिल्हास्तरावर यंग ब्रिगेड स्थापन करण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील तरुणांना या उपक्रमात सामावून घेण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. राज्यपाल भवनाकडून आयोजित करण्यात येणारे 'आविष्कार' व 'आव्हान' या उपक्रमांसाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. 'आव्हान'सारख्या महत्त्वाच्या व देशाला आवश्यक असलेल्या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यापीठ पुढे सरसावले आहे. नैसर्गिक आपत्ती कधी सांगून येत नाही.
अनेकदा प्रशिक्षित कर्मचार्‍यांअभावी अशावेळी परिस्थिती हाताळण्यात प्रशासनही हतबल ठरते. या वेळी जर युवक एक झाला, त्याने आपली ताकद नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी लावली तर संभाव्य आर्थिक आणि जीवित हानीचे प्रमाण आटोक्यात आणण्यास मदत होईल.