आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भगवान गडावर या, पण राजकीय भाषणबाजी नकाे, नामदेव शास्त्रींची पंकजा मुंडेंना अट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंकजा मुंडेंनी केलेले फेसबूक पोस्ट. - Divya Marathi
पंकजा मुंडेंनी केलेले फेसबूक पोस्ट.
मुंबई/ नगर - वंजारा समाजासह लाखाे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान गडावर (जि. नगर) दरवर्षी साजरा हाेणारा दसरा मेळावा यंदा चांगलाच वादात अडकला अाहे. दिवंगत भाजप नेते गाेपीनाथ मुंडेंनी गेल्या अनेक वर्षांत या गडावरून दसऱ्याला राजकीय भाषण करत समाजाला ‘संदेश’ दिला. मात्र अाता त्यांच्या पश्चात मुंडेंच्या कन्या व राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंना मात्र या ठिकाणी राजकीय भाषण करण्यास खुद्द गडाचे महंत नामदेवशास्त्रींकडून विराेध हाेत अाहे. त्यामुळे पंकजा दसऱ्याला येणार की नाही अशी शंका उपस्थित हाेत असतानाच ‘अापण गडाची लेक म्हणून येणारच’ असे पंकजांनी स्पष्ट केले. त्यावर त्यांचे स्वागत करताना ‘गडावर या, पण राजकीय भाषण नकाे’ अशी अट नामदेवशास्त्रींची घातली अाहे.

नगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवर भगवान गड अाहे. या ठिकाणी हाेणाऱ्या दसरा मेळाव्यावरून गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्यात चांगलीच जुंपली आहे. गाेपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांनी परळीत भगवानगडाच्या धर्तीवर गाेपीनाथ गडाची निर्मिती केली. त्यामुळे अाता गाेपीनाथ गडावरून राजकीय कार्यक्रम घ्यावेत व भगवान गडावर केवळ धार्मिक कार्यक्रम हाेतील, असे नामदेवशास्त्रींनी स्पष्ट केले हाेते. मात्र मुंडे समर्थकांना हे मान्य नाही. याच कारणावरून काही दिवसांपूर्वी गडाचे समर्थक व मुंडे समर्थक यांच्यात भगवान गडावर झटापटही झाली हाेती. खुद्द नामदेवशास्त्रींवर गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे दसरा मेळाव्याला जातील की नाही? अशी शंका उपस्थित हाेत हाेती. मात्र पंकजांनी साेशल मीडियातून ‘अापण गडाची लेक म्हणून मेळाव्याला जाणारच’ असे जाहीर केले.

घरी येण्यास परवानगी कशाला
पंकजा मुंडेंच्या भूमिकेनंतर वृत्तवाहिनीशी बाेलताना महंत नामदेवशास्त्री म्हणाले, ‘पंकजा मुंडेंनी सामान्य भक्ताप्रमाणे गडावर यावं, त्यांना कोणीही रोखणार नाही. हे मंदिर आहे, इथे येण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही. मात्र हा धार्मिक ट्रस्ट आहे. त्यामुळे ट्रस्टने निर्णय घेतल्याप्रमाणे इथे भाषण होणार नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंनी इथे भाषण करू नये. पंकजाला अाम्ही मुलगी म्हणून स्वीकारलंय. मग बापाच्या घरी येण्यासाठी तिला परवानगीची काय गरज?’ असा सवालही नामदेवशास्त्रींनी विचारला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पंकजांचे भगवान गडावरील PHOTO..
बातम्या आणखी आहेत...