आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘नारंगी’चे पाणी पेटले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- वैजापूर शहरासह परिसरातील 22 गावांची तहान भागवणारा नारंगी प्रकल्प भरपावसाळ्यात कोरडाच आहे. नाशिकच्या पालखेड धरणातून पाणी सोडण्याचे आदेश असतानाही अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला आहे. हक्काचे पाणी लवकर सोडा अन्यथा पालघर धरणाचे दरवाजे तोडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

शहरालगत 1999 ला पाटबंधारे विभागाने अर्धा टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या नारंगी मध्यम प्रकल्पाची उभारणी केली. वैजापूरसह 22 गावांची तहान या प्रकल्पावर अवलंबून आहे. दोन वर्षांपासून कमी पाऊस झाल्याने हा प्रकल्प कोरडा आहे. मात्र, यंदा नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पालखेड शंभर टक्के भरले आहे.

या धरणातून 6.91 दशलक्ष घनमीटर ओव्हर फ्लोचे पाणी नारंगीत कालव्याद्वारे सोडावे, अशी मागणी पाटपाणी संघर्ष समितीचे ज्ञानेश्वर जगताप, अ‍ॅड. आर.डी.थोट, नारंगी संघर्ष समितीचे काळू वैद्य, विष्णू बावचे, मंजाहरी गाढे, गणेश गायकवाड आदींनी औरंगाबाद पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अ.प्र. कोहरीकर यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता यांना 7 ऑगस्टला पालखेड धरणातून नारंगीत 6.91 दलघमी पाणी सोडावे, असे पत्र दिले होते. मात्र, या विभागाने पत्राला केराची टोपली दाखवत अद्यापही पाणी सोडले नाही.

संघर्ष समितीच्या बैठका
पाटपाणी संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी लाभक्षेत्रातील नांदगाव, चांडगाव, पानवी खुर्द, रोटेगाव, लाख, फुलेवाडी, इंगळे वस्ती आदी ठिकाणी बैठका घेतल्या.