आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’चा पुढाकार, उद्या गरजू 22 दिव्यांगांना सायकली, 20 घरकुलांचे वाटप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तालुक्यातील देवस्थानांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील २२ दिव्यांगांना तीन चाकी सायकली आणि २० दिव्यांगांना घरकुल वाटपाचा सोहळा मंगळवारी (दि. १५) सकाळी ९.३० वाजता भक्त निवास सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
 
दै. दिव्य मराठी, आमदार प्रशांत बंब, जि.प. सदस्य प्रा. सुरेश सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, तहसीलदार अरुण जऱ्हाड, पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, गटविकास अधिकारी हरिश्चंद्र कहाटे यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जि. प. सदस्य प्रा. सोनवणे, उपसभापती गणेश नाना अधाने, पंचायत समिती सदस्य प्रभाकर शिंदे यांनी केले आहे.
 
वर्षभरात ‘दिव्य मराठी’ने चालवलेल्या अभियानामुळे दिव्यांगांच्या मदतीसाठीचा हा मोठा कार्यक्रम खुलताबाद येथे होणार आहे.   या कार्यक्रमाला आमदार प्रशांत बंब,  ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक दीपक पटवे, जाहिरात विभागाचे महाराष्ट्र प्रमुख सुभाष बोंद्रे, प्रा. सुरेश सोनवणे, आरित फाउंडेशनचे कार्यकारी प्रमुख अनिल घुगे, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजगुरू, तहसीलदार जऱ्हाड, तत्कालीन तहसीलदार बालाजी शेवाळे, माजी नगराध्यक्ष अॅड. कैसरोद्दीन, जि. प. सदस्य हिंदवी खंडागळे, एल. जी. गायकवाड, सभापती अर्चना अंभोरे, उपसभापती गणेश नाना अधाने, पंचायत समिती सदस्य प्रभाकर शिंदे, रेखा चव्हाण, युवराज ठेंगडे, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, प्रकाश वाकळे, भाजप तालुकाध्यक्ष नलावडे,  पोलिस निरीक्षक हरीश खेडकर, उरूस व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मुनिबोद्दिन मुजीबोद्दिन, माजी नगराध्यक्ष अॅड. कैसरोद्दिन, गिरजादेवी संस्थान, घृष्णेवर मंदिर देवस्थानचे पदाधिकारी, भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...