उस्मानाबाद- वैद्यकीय रजेवरील शिपायाला प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू करून घेण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणार्या तसेच यातील सात हजार रुपये यापूर्वीच घेऊन उर्वरित तीन हजार रुपये स्वीकारत असताना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकार्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी सकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थानी करण्यात आली. रईस हाश्मी असे लाच घेणार्या अधिकार्या चे नाव आहे. तक्रारदार संजय राठोड ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ते आजारी रजेवर होते. रुजू करून घेण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी रईस हाश्मी यांनी राठोड यांना 10 हजार रुपयांची लाच मागितली. सुरुवातीला राठोड यांनी 7 हजार रुपये हाश्मी यांना दिले. उर्वरित तीन हजार रुपये नंतर देण्याचे ठरले होते. त्यात ते अडकले गेले.
500 रुपयांची लाच घेणारा शिक्षक जाळ्यात
जालना- टीसीची दुय्यम प्रत देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेणाºया राजू जाधव या शिक्षकास पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे लिपिकपदाचा अतिरिक्त पदभार होता. भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील विनय हायस्कूलमध्ये ही कारवाई करण्यात आली.