आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त, जिल्हाधिकाऱ्यांसह ६० जणांचे रक्तदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील संबोधी अकादमीच्या वतीने बुधवारी (दि. सहा) आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्यासह ६० जणांनी रक्तदान केले.

संबोधीच्या वतीने १७ वर्षांपासून डॉ. आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन हा आत्मचिंतन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच दरवर्षी या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. सुपर मार्केट येथे झालेल्या शिबिराचे उद््घाटन जिल्हाधिकारी महिवाल यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा समाज निर्माण झाला पाहिजे.

त्यांचे कार्य संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी आहे, असे मत व्यक्त करत संबोधीच्या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जावीद अथर यांनी संबोधीने रक्तदान चळवळ अधिक गतिमान केल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण होत नसल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात अकादमीचे अध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे यांनी समाजाने आत्मचिंतन करून डॉ. आंबेडकरांचे विचार आत्मसात केले पाहिजेत, असे आवाहन केले. याप्रसंगी प्राचार्य विठ्ठलराव घुले, बी. एस. सहजराव, डॉ. अरविंद सावते, दि. फ. लोंढे उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...