आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठीकडून उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात गरजवंतांना ३५ टन 'अन्नदान'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अन्नदानात मिळालेले धान्य घेऊन आनंदात निघालेले ग्रामस्थ. - Divya Marathi
अन्नदानात मिळालेले धान्य घेऊन आनंदात निघालेले ग्रामस्थ.
भास्कर समूहाच्या "अन्नदान' अभियानाअंतर्गत “दिव्य मराठी’च्या वतीने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना मंगळवारी धान्य वाटप झाले . उस्मानाबाद जिल्ह्यात आंबीत २५ टन तर बीड जिल्ह्यात भानकवाडी व हाटकरवाडीत ग्रामस्थांना १० टन धान्य वाटप करण्यात आले.
उस्मानाबाद - दैनिक भास्कर समूहाने अन्नदान अभियानाअंतर्गत संकलित केलेल्या धान्याचे. भूम तालुक्यातील आंबी येथे दुष्काळग्रस्तांना वाटप करण्यात आले. २५ टन धान्य वाटप करून मंगळवारी या उपक्रमाचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी विविध राज्यात भास्कर समूहाच्या वाचकांनी अन्नदान केले आहे. हे धान्य गरजूंना वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ७४ टन धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. मंगळवारी या उपक्रमाचा शुभारंभ अांबी येथून करण्यात आला. या वेळी भूमचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार अरविंद बोळंगे, आंबीचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तांबे, पंचायत समिती सभापती शिवाजी जालन, माजी सभापती अण्णा भोगील, सरपंच उषाताई गटकळ,अंबिका विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरव आदी उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी पवार म्हणाले, "दिव्य मराठी'ने अन्नदान अभिनयाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे. यामुळे येथील शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलले आहे. तहसीलदार बोळंबे यांचेही भाषण झाले.

आंबीमध्ये गेल्या दोन महिन्यात दुष्काळी परिस्थितीमुळे २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांची, शेतमजुरांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी गावातील सुमारे ५५० गरीब कुटंुबांना धान्य वाटप केले. अन्नदानाची सुरुवात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाइकांना धान्य देऊन करण्यात आली. दाेन महिन्यांपूर्वी मनीषा गटकळ या महिलेने उपासमारीने पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. मनीषा गटकळ यांचे पती लक्ष्मण गटकळ यांना सर्वप्रथम धान्य वाटप करण्यात आले.

राेपटे देऊन सत्कार
दुष्काळी परिस्थतीमुळे हार-तुरे टाळून "दिव्य मराठी'ने मान्यवरांचा रोपटे देऊन सत्कार केला. त्यामुळे या कार्यक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला गेला आहे.
आमची शासनानेही अजून दखल घेतली नाही. पण अन्नदान अभियानामुळे आधार दिला. त्याबद्दल दिव्य मराठीचे आभार.
- अलका बनसोडे,
आमचे हातावरचे पोट आहे. संकटाच्या परिस्थितीत अन्नदान अभियानात झालेल्या मदतीमुळे आमची दिवाळी गोड होणार आहे.
विजुबाई गायकवाड
अनेक महिन्यांपासून घरची परिस्थिती कठीण आहे. हाताला काम नाही.अन्नदानामुळे आम्हाला आधार मिळाला आहे.
बिस्मिल्ला शेख,
हा केवळ धान्याचा आधार नसून, त्यातून जगण्याचे बळ मिळाले आहे. धान्यामुळे आमचे काही दिवस चांगले जातील.
पाकिजा शेख,
दैनिकांनी असा विधायक कार्यक्रम घेण्याची ही पहिली घटना असेल. यामुळे शेतकरी, ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
उषाताई गटकळ, सरपंच, आंबी, ता.भूम
पुढे वाचा, बीडमध्ये 300 कुटुंबांना आधार...