आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी अन्नदान : दुष्काळग्रस्तांना दिवाळी भेट, सामाजिक जाणिवेस सर्वांची दाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भास्कर समूहाच्या अन्नदान अभियानाअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, परंडा तालुका तसेच बीड जिल्ह्यात पाटोदा, शिरूर, आष्टी तालुक्यातील विविध गावांत "दिव्य मराठी' च्या वतीने बुधवारी सुमारे साडेपाच हजार कुटुंबीयांना १३८ टन धान्य वाटप करण्यात आले.
ढोकी - दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर दैनिक "दिव्य मराठी'ने सामाजिक जाणीव ठेवत दुष्काळग्रस्तांना मदत देण्याचा उपक्रम सामाजिक जाणिवा दर्शविणारा अाहे, असे मत उस्मानाबादचे तहसीलदार सुभाष काकडे यांनी केले.
उस्मानाबाद जिल्ह्यात अन्नदान अभियानांतर्गत धान्य वाटप सुरू असून बुधवारी उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, डकवाडी, पानवाडीत ३०० कुटुंबांना १० टन धान्यवाटप करण्यात आले.
टिळा होळी, सार्थक दीपावली व दुष्काळग्रस्तांसाठी अन्नदान अभियान असे अनेक सामाजिक उपक्रम राबविणारे "दिव्य मराठी' हे एकमेव वृत्तपत्र आहे. केवळ बातम्या छापण्यापुरतेच मर्यादित न राहता, सामाजिक जाणिवा जागृत ठेवत "दिव्य मराठी'ने त्या पूर्ण केल्या, असे गौरवोद््गारही काकडे यांनी काढले. यावेळी कोळेवाडीच्या सरपंच राजकन्या राऊत, मंडळ अधिकारी राजाभाऊ नाईकनवरे, "दिव्य मराठी'चे जळगाव युनिटचे पुनीत शर्मा, सोलापूर युनिटचे नितीन बुऱ्हाणपुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सामाजिक व पर्यावरणाची जाणीव ठेवून मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत
करण्यात आले.
कात्राबाद, खानापूर येथे २१ टन धान्य वाटप
परंडा | तालुक्यातील कात्राबाद व खानापूर येथे बुधवारी परंडाचे तहसीलदार स्वरुप कंकाळ, पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे, पत्रकार सुरेश घाडगे आदींच्या उपस्थितीत "दिव्य मराठी'चा अन्नदान वाटप कार्यक्रम झाला. भास्कर समूहाने अन्नदान अभियानातून सामाजिक बांधिलकी जपल्याचे तहसीलदार कंकाळ यांनी सांगितले. यावेळी दोन्ही गावातील ४६० कुटुंबांना २१ टन धान्य वाटप करण्यात आले. उपनिरीक्षक डी.पी.सानप, पत्रकार मुजीब काझी, आनंद खर्डेकर, प्रकाश काशीद, खानापूर येथील अॅड. एस.डी.गटकुळ,पोलिस पाटील दिलीप परिहार, शंकर गटकुळ, सुरेश गटकुळ, देविदास झोरे, सुखदेव इनामे, ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे वाचा, दुसऱ्या दिवशी आष्टीमध्ये अन्नदान...