आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट: लातुरात स्वाइन फ्लू रुग्णांसाठी स्वतंत्र वाॅर्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- शहरात स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्यानंतरही सुस्त असलेल्या सरकारी यंत्रणेला दैनिक दिव्य मराठीत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जाग आली असून, जनजागृती करण्याबरोबरच जिल्हा रुग्णालयात संशियत रुग्णांसाठी आयसोलेशन वाॅर्ड सुरू करण्यात आला आहे.

स्वामी विवेकानंद रुग्णालयात दाखल २८ वर्षीय गरोदर महिलेला स्वाइन फ्लू झाल्याचा अहवाल पुण्याच्या प्रयोगशाळेने २५ जानेवारीला दिला आहे. त्यानंतरही सरकारी यंत्रणेकडून जनजागृती किंवा संबंधित यंत्रणा सज्ज नव्हती. २८ जानेवारी रोजी त्यासंदर्भातील वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले. वास्तविक पाहता सदर रुग्णावर १९ जानेवारीपासूनच संशयित म्हणून उपचार सुरू करण्यात आले होते. त्याच वेळी विवेकानंद रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सरकारी यंत्रणेला कळवले होते; परंतु जनजागृतीसंदर्भातही काहीच हालचाली सुरू करण्यात आल्या नव्हत्या.