आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे कपडे मिळाले; अनाथ बालकांचे चेहरे उजळले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- वसुंधरा प्रतिष्ठानने कपडा बँक उपक्रम राबवला. अनाथ बालकांसाठी अनेकांनी नवे कोरे कपडे घेऊन दिले. हासेगावच्या सेवालय संस्थेतील अनाथ मुलांना शुक्रवारी कपडे वाटप झाले. दिवाळीच्या सणाला नवे कोरे कपडे मिळाल्याने बालगोपाळ हरखून गेले. सोशल मीडियातून लोकसहभागाने जमवलेली मिठाई, कपडे वाटप केल्यानंतर सेवालयात दिवे लावून दीपोत्सवही साजरा करण्यात आला.

दरवर्षी उपक्रम राबवणार
लोकसह भागातून झालेला हा पहिलाच उपक्रम ठरला. दरवर्षी दिवाळीत तो राबवण्याचे प्रतिष्ठानने ठरवले आहे. एकच का होईना, पण नवा ड्रेस घेऊन देण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.
बातम्या आणखी आहेत...