आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलची झाडाझडती, तब्बल अडीचशे प्रस्ताव धूळ खात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
वैजापूर - वैजापूर तहसीलच्या कारभाराचे पितळ दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात उघड झाले. कार्यालयातील महसूल जमा २ या विभागातील कपाटामध्ये तब्बल २५० प्रस्ताव धूळ खात पडून होते. तब्बल तीन तास त्यांनी तहसील कार्यालयातील कामकाजाची पाहणी केली. त्यामुळे सर्वांनाच घाम फुटला होता.

जिल्हाधिकारीपदी नुकतेच रुजू झालेले वीरेंद्र सिंह यांनी गुरुवारी दुपारी अडीच्या सुमारास अचानक वैजापूर तहसील कार्यालयास भेट दिली. प्रथम त्यांनी तहसीलदारांच्या दालनात कार्यालयातील संजय गांधी विभाग व दुष्काळी अनुदान वाटपाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी कार्यालयातील महसूल जमा २ या कक्षाकडे आपला मोर्चा वळवला. या तपासणीमध्ये संचिकांचा कोठेच ताळमेळ लागत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जिल्हाधिकाऱ्यांनी रोजच्या कामकाज पुस्तिका व रोजनाम्याविषयी विचारले असता तहसीलदारांसह सर्वांचीच बोलती बंद झाली. या प्रश्नाचे कोणीच उत्तर न देता मौन बाळगले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा पारा चांगलाच चढला. रोज काय काम करायचे किंवा काय काय केले याबाबत कामकाज पुस्तिकेत नोंद करणे आवश्यक आहे. मात्र, कामकाज पुस्तिकाच कार्यालयात नसल्याने आश्चर्य व्यक्त करत तुम्ही सर्व अधिकारी आहात तुम्हाला याची माहिती असू नये ही खेदाची बाब म्हणावी लागेल, असे खडे बोल सुनावले. तब्बल २५० संचिका मंजुरीच्या प्रतीक्षेत पडलेल्या होत्या. न्यायालयीन प्रकरणे, भूसंपादन व रस्त्याच्या प्रकरणाबाबत कित्येक वर्षांच्या संचिका धूळ खात पडून होत्या. या संचिकांचा कोठेच ताळमेळ लागत नसल्याने त्यांनी तीव्र ाराजी व्यक्त केली.

तुम्हाला झोप येते कशी?
दरम्यान, कार्यालयातील काही प्रस्तावांवर ते कधी दाखल झाले याच्याही नोंदी नव्हत्या, तर काही निकाल लागलेल्या प्रस्तावांची पाहणी केली असता हा निकाल कोणत्या सबळ कारणाने देण्यात आला, हे स्पष्ट करून सांगा, असे म्हणताच तहसीलदार व संबंधित कर्मचाऱ्यांची बोलतीच बंद झाली. इतके प्रस्ताव पडून असताना तुम्ही झोपू कसे शकता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या विभागातील संचिकेतील रोजनामा लिहिण्याच्या पद्धतीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.